fbpx

वाळू वाहतूकसाठी मंडळाधिकाऱ्याकडून लाचेची मागणी ; व्हिडिओ व्हायरल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । वाळू वाहतूक करण्यासाठी सावदा येथील मंडळाधिकारी बाबू पवार यांनी ५० हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची महसूल विभागातर्फे फैजपुरचे प्रांताधिकारी यांच्या मार्फत विभागीय चौकशीअंती मंडळाधिकारी बाबू पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत असे की, वाळू वाहतूक करण्यासाठी सावदा येथील मंडळाधिकारी बाबू पवार यांनी ५० हजार रुपयाची रक्कम मागणी केल्याची तक्रार शांताराम देवसिंग पाटील (रा.लुमखेडा) यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. त्यापैकी मंडळाधिकारी पवार यांनी १० हजार रुपये स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

या प्रकरणाची महसूल विभागअंतर्गत प्रांताधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू होती. येथील मंडळाधिकारी पवार हे रुजू झाल्यापासून त्यांच्या अडवणूक व भ्रष्ट कारभारबाबत अनेक दिवसापासून दबक्या आवाजात चर्चा होत होतीच.पण कोणी तक्रारदार पुढे येत नव्हते. अखेर शांताराम पाटील व त्यांचे वाहन चालक शेख.शरीफ यांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली होती व सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मंडळाधिकारी पवार यांनी वाळू वाहतुकीसाठी मालकास ५० हजार लाच मागितली होते. त्यापैकी त्यांनी रू.१०हजार स्वीकारले. अशी तक्रार फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत पाठविला होता. त्यावर जिल्हाधिकारी यांनी बाबू पवार यांना काल दि. २५ रोजी निलंबित केल्याचे पत्र पाठविले.

*पहा एक्स्क्लुझिव व्हिडीओ*

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज