जळगाव लाईव्हचे वृत्त ठरले खरे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असून विद्यमान अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या जागी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक अशोक लाडवंजारी यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्युजने तीन महिन्यांपूर्वी दिले होते. जळगाव लाईव्हचे वृत्त खरे ठरले असून अखेर अशोक लाडवंजारी यांची महानगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या जागी अशोक लाडवंजारी यांची निवड होणार असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने दिले होते. जळगाव लाईव्हचे वृत्त खरे ठरले असून अशोक लाडवंजारी यांची महानगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील यांना फोन करून निवडीबाबत कळविले असून मला मंगळवारी मुंबईला बोलाविले असल्याची माहिती अशोक लाडवंजारी यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज