fbpx

महाराष्ट्र राज्य जि.प. आ सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केला ‘ अशांचा’ निषेध

जळगाव लाईव्ह । ३ जुलै २०२१ । आशांचा राज्यव्यापी संपामध्ये नांदेड जिल्हातील मोर्च्यात आरोग्य सेविका (परिचारिका) बद्दल अपमानास्पद अपशब्द वापरल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेतील सर्व आरोग्य सेविका यांनी एकत्रित येवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांना मेलद्वारे व जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांना महाराष्ट्र राज्य जि. प. बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा जळगाव यांचा तर्फे निवेदन देवून जाहीर निषेध व्यक्त केला .

तसेच जो पर्यंत संबंधीत आशा आपल्या संघटना प्रमुख यांच्या सांगण्यावरून जाहीर माफीनामा संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे व्हिडीओ क्लीप वायरल करत नाही. तोपर्यंत सर्व आरोग्य सेविका दि.०१/०७/२१ पासून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहे. असे निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य जि. प. बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना ११७३-०४ जिल्हा जळगाव यांचा तर्फे अध्यक्ष . ए. एस. सपकाळे, राज्य कार्यध्यक्ष धनराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष श्रीमती इदिरा सोनवणे, राज्य संघटक सुजाता बागुल, जिल्हा कार्यध्यक्ष प्रेमलता पाटील, अरुण खरात, जिल्हा संघटक पल्लवी भारंबे यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज