इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. पूनम पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । इंडियन डेंटल असोसिएशनची महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यात अध्यक्षपदी डॉ. पूनम पाटील तर सचिव म्हणून डॉ. नीलम किनगे यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही कार्यकारिणी राहणार असून, दंतवैद्यकांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे, शाळांमध्ये तपासणी शिबिरांचे आयोजन करणे यांसह विविध प्रकारचे उपक्रम राबविणार आहेत.

या कार्यकारिणीत डॉ. वर्षा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. प्रियंका गांधी, डॉ. सिमरनकौर जुनेजा, सहसचिव डॉ. अंशिमा जैन, डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी खजिनदार डॉ. शीतल मंडोरा, डॉ. सोनल पाटील, डॉ. प्रियंका भंसाळी, डॉ. मेघना नारखेडे, डॉ. गोल्डी चावला, डॉ. निकिता तलरेजा, डॉ.प्रिती बडाले, डॉ. नेहा अग्रवाल, डॉ. पुष्पा चौधरी, डॉ. माधुरी पाटील, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. मेघना तोतला, डॉ. शीतल बारी, डॉ. किरण फेरवानी यांची निवड करण्यात आली आहे. दंतवैद्यकांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे, शाळांमध्ये तपासणी शिबिरांचे आयोजन करणे यांसह विविध प्रकारचे उपक्रम राबविणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -