कल्याण काँग्रेसच्या प्रभारीपदी डाॅ. उल्हास पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ ।  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी तर चंद्रकांत पाटील यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी तर चंद्रकांत पाटील यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आगामी काळात जबाबदारी दिलेल्या क्षेत्रात संघटना वाढवणे, आगामी निवडणुकीसाठी रचना करण्याचे काम या माध्यमातून अपेक्षित आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज