आदीवासी प्रकल्पस्तरिय समिती सदस्यपदी एम.बी. तडवी, जुबेदा तडवी यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । यावल येथील आदीवासी चळवळीतील जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते एम.बी. तडवी आणि जुबेदा मुजाद तडवी यांची आदीवासी विकास एकात्मिक प्रकल्पस्तरिय जिल्हा समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे आदीवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या आदेशाने चोपडा येथील डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापातळीवरील प्रकल्पस्तरीय समितीवर यावल येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम.बी. तडवी आणि जुबेदा मुजाद तडवी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. एम.बी. तडवी यांच्या निवडीमुळे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात पाडया वस्तीवरील वास्तव्यास असलेल्या आदीवासी बांधवांच्या शैक्षणिक व विविध मुलभुत नागरी समस्या मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

एम.बी. तडवी व त्यांच्या पत्नी जुबेदा तडवी यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवीन्द्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अतुल पाटील, युवकचे तालुका अध्यक्ष ऍड. देवकांत पाटील, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, चोपडा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अनिल साठे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे आदींकडून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज