fbpx

अल्पवयीन मुलीला पळविणारा शेतातून जेरबंद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । अमळनेर तालुक्यातील आजी सोबत आलेली अल्पवयीन मुलगी अमळनेर बसस्थानकावरून मोटरसायकलवर आलेल्या तरुणासोबत पळून गेली होती. दरम्यान, पळवून नेणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील तरुणाला मुलीसह अमळनेर पोलिसांनी चांदवड तालुक्यातून शेतातून ताब्यात घेतले आहे.

याबाबत असे की, एक वृद्ध महिला आपल्या अल्पवयीन नातीला मुलीला भेटायला घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर आली असताना त्या मुलीने लघुशंकेला जाऊन येते असे सांगून मुलगी गायब झाली. आजी व नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती मुलगी मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी पी ९३०७ वर एका तरुणाबरोबर निघून गेल्याची माहिती मिळाली.

ही मोटरसायकल गोपीचंद बारकू पवार रा. डाबली धांदरने ता. शिंदखेडा या तरुणाच्या ताब्यात होती आणि काही दिवसांपूर्वी याच मुलाने तरुणीला पळवून नेणार असल्याचे वक्तव्य केले होते. असे आजीने सांगितल्यावरून आजीने अमळनेर पोलीस स्टेशनला गोपीचंद पवार यांच्या विरुद्ध अपहरणाची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस नाईक दीपक माळी डॉ. शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे यांच्या पथकाला गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मागावर पाठवले. आरोपी देवळा तालुक्यात गेल्याचे समजले तेथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने तो वाझगाव येथे शेतात लपला असल्याचे समजताच पथकाने त्याला व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. दोघांना अमळनेर आणल्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलीला पळवण्यासाठी आणखी दोघांची मदत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे मुलीच्या जाबजबाबवरुन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज