fbpx

गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत माजविणार्‍या तरूणास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत माजविणार्‍या तरूणाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. यश उर्फ सोनू युवराज तायडे ( वय १९) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

याबाबत असे की, वरणगाव येथील प्रतिभा नगरात एक तरूण हा गावठी कट्टयाचा धाक दाखवून लोकांना घाबरवत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी एक पथक तयार करून वरणगावच्या प्रतिभा नगरात कारवाई केली.

mi advt

यात यश उर्फ सोनू युवराज तायडे या तरूणाची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे २० हजार रूपये मूल्याचा गावठी कट्टा आढळून आला. यामुळे कट्टा जप्त करून यश तायडे याला अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई 

या पथकामध्ये सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ दिपक पाटील, हे.कॉ लक्षमण पाटील, पो.ना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील आणि राजेंद्र पवार यांचा समावेश होता.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व एलसीबीचे वरिष्ठ निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज