fbpx

तलवार, कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील जिजाऊ नगरात तलवार व कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात शुक्रवार दि.१ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास एक ४५ वर्षीय इसम तलवार व कोयता घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ. हरीलाल पाटील, नितीन पाटील, वासू मराठे, पोना. विश्वनाथ गायकवाड, धर्मेंद्र ठाकूर, पोकॉ. दिपक कोळी आदींनी जिजाऊ नगरात जाऊन पाहणी करून मुकुंदा यशवंत सपकाळे (वय-४५, रा. जिजाऊ नगर), याला तलवार व कोयत्यासह अटक केली. मुकुंदा सपकाळे याच्याविरुद्ध पोकॉ. दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज