⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | Jalgaon : व्यापाऱ्याच्या कारमधून पैशांची बॅग लांबविणारे पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon : व्यापाऱ्याच्या कारमधून पैशांची बॅग लांबविणारे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । व्यापाऱ्याच्या कारमध्ये असलेली सव्वालाख रुपयांची बॅग लांबविणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे चोरीची एक लाख २० हजारांची रक्कम मिळून आली. जितेंद्र रंगलाल चव्हाण (वय ३२), रवींद्र मधुकर जाधव (३१, दोघे रा. टाहकळी, ता. मुक्ताईनगर), बंडू जेता राठोड (२८, मोझीरा, ता. मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या चोरांचे नाव आहे.

काय आहे घटना?
गुजरात राज्यातील सुरत येथील व्यापारी हिरेनभाई किरीटभाई रावल हे भुसावळला कामानिमित्ताने आले होते. दरम्यान ते जळगावात दाखल झाले असताना दादावाडी जैन मंदिराबाहेरील एटीएमजवळ कार उभी केली. त्याच वेळी एक तरुण त्यांच्या कारसमोरच चक्कर येऊन खाली पडला. या तरुणाला त्याला उचलण्यासाठी चालकासह हिरेनभाई मदतीला धावले. याच वेळी चोरट्यांनी कारमधील रोकड असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिरेनभाई यांनी बॅग चोरीला गेल्याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान चोरटे भुसावळच्या दिशेने गेल्याचे समजताच चालक महेश सूर्यवंशी यांनी पोलिस वाहनाने त्या दिशेने रावण झाले. मात्र पोलिस पिच्छा करत असल्याचे कळताच चोरट्यांनी दुचाकी सोडून शेतातून पळ काढला. गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीची एक लाख २० हजारांची रक्कम मिळून आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.