fbpx

शेती उपयोगी साहित्य चोरणारा अटकेत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे (वय-२५ रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, मन्यारखेडा शिवारात एमआयडीसी भागातून शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करण्याची कंपनीतून कामाचे वस्तू ६ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे याला आज बुधवारी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून ७ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई  

पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt