fbpx

महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । नॅशनल हायवे क्रमांक 6 वर गाड्या अडवून लुटमारीचं काम करणाऱ्या ३ जणांच्या मुसक्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आहे.

याबाबत असे की, भुसावळ ते जळगाव दरम्यानच्या हायवेवर काही चोरटे गाड्या अडवून नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने वेळ न दडवता नॅशनल हायवे क्रमांक 6 वर धाव घेतील. पोलिसांनी अंत्यंत संयमीपणे ही कारवाई केली.

पोलीस हायवेवर ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा तिथे पाच इसम हातात हत्यारे घेऊन लुटमारीच्या तयारीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पाचही जणांकडे लुटमारीसाठी आवश्यक असणारे सर्व हत्यारे होते. पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस आल्याचं कळताच काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पण पोलिसांनी तिघांना पकडलं. तरीही दोन आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत तिवारी (वय 26), अक्षय शामकांत कुलकर्णी (वय 23), आवेश शेख बिस्मिल्ला (वय 20) अशी तीन आरोपींची नावे आहेत. यातील भरत हा नारखेडे शाळेजवळ तापी नगर येथे राहतो. तर अक्षय कुलकर्णी हा आरोपी नारायण नगर तर आरोपी आवेश हा जिया कॉलनी येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी मुज्जीमल शेख कलिम (वय 19) यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच प्रभारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम 399, 402, 37(1),(3), मुंबई पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज