fbpx

पातोंडा येथील जवानाचे काश्मीरमध्ये निधन ; उद्या अंत्यसंस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । पातोंडा येथील जवान गणेश भिमराव सोनवणे (वय ३६) यांचे जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असताना दि.५ ऑक्टोबरला आकस्मित निधन झाले. जवान गणेश यांच्या निधनाची बातमी कळताच कुटूंबांवर व गावावर शोककळा पसरली.

याबाबत असे की, गणेश हा 14 मराठा बटालियन मधे सेवेत असून त्याची आता पर्यंत 16 वर्ष 9 महीने सेवा झाली असून तो येत्या डिसेंबर महिन्यात 17 वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होता तोवर त्याच्यावर काळाने घाला घातला. वयाच्या 20 व्या वर्षी गणेश देशसेवेत दाखल झाला होता. त्याचा देह (शव) आर्मीचे सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई येथे येणार असून मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पातोंडा येथे येणार आहे. त्या करीता आवश्यक होकार त्यांची पत्नी सीमा हिने आर्मी अधिकाऱ्यांना कळवले आहेत.

उद्या अंत्यसंस्कार
गणेश यांचा अंत्यसंस्कार उद्या (ता. 7) रोजी पातोंडा येथेच सर्व शासकीय इतमामात होणार आहे. गणेशच्या पश्चात आई, पत्नी सीमा, दोन मुली असून प्रांजल (12 वर्ष) व पिऊ (9 वर्ष) असा परीवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज