दोन गटात तुफान हाणामारी; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । चोपडा शहरातील साने गुरुजी वसाहतीजवळ दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकावर चाकूने वार तर दुसऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.ही घटना २९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी येथील शहर पोलिसांत दोन्ही गटांमधील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

गुन्हा शिवाजी भोई, आकाश भोई, आरबाज अजीज खान पठाण, कलीम शेख सलीम हलवाई, शाबीर शेख सलीम हलवाई, गुलाम रसूल मोमीन (सर्व रा. सानेगुरुजी वसाहत चोपडा) यांच्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील शिवाजी भोई, आकाश भोई, अरबाज पठाण, शाबीर हलवाई, कलीम शेख हलवाई यांना पोलिसांनी अटक केली आहे. २९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गुलाम रसूल मोमीन याने मित्रांसह शहरातील साने गुरुजी वसाहतजवळ आकाश भोई यास रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. गुलाम रसुल मोमीन याने दगडाने भोई यास मारहाण केली. याप्रकरणी आकाश भोई याच्या फिर्यादीवरून आरबाज पठाण, कलीम हलवाई, शाबीर हलवाई, गुलाम मोमीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत गुलाम रसुल मस्तान मोमीन हा २९ रोजी दुपारी कामावरुन पायी घरी जात असताना, साने गुरुजी वसाहतीकडील सार्वजनीक शौचालयासमोर आकाश भोई याने, गुलाम मोमीन याला शिवीगाळ करुन मारहाण केली. तर आकाश भोई याने मोमीनच्या गळ्यावर चाकूने वार करुन दुखापत केली. याप्रकरणी गुलाम रसुल मस्तान मोमीन याच्या फिर्यादीवरून शिवाजी भोई, आकाश भोई यांच्याविरोधात चाेपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -