सम्राट कॉलनीत वाद, तरुणावर चॉपर हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । शहरातील सम्राट कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने एकावर चॉपरने वार करण्यात आला आहे.

सम्राट कॉलनी परिसरात रात्री ९.३० च्या सुमारास दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने बबलू गायकवाड रा.दीक्षितवाडी याच्यावर चॉपरने वार करण्यात आला. घटनास्थळी लागलीच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. हल्ला करणारा तरुण लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी असून काल देखील त्यांच्यात वाद झाल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज