मध्यरात्री आरडाओरड व शिवीगाळ; सात जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । मोहाडी रस्त्यावर मध्यरात्री आपसात झोंबाझोंबी करून वाद करणाऱ्या सात जणांविरुद्ध ८ रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर हॉटेल सुरू ठेवली म्हणून हॉटेल मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यानेच सरकारकडून फिर्यादी होऊन तक्रार दिली.

सविस्तर असे की, एमआयडीसी पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री गस्तीवर असताना दीड वाजता मोहाडी रस्त्यावर हॉटेल मराठा गार्डनसमोर काही जण जोरजोरात आरडाओरड व शिवीगाळ करून हाणामारी करीत असल्याचे दिसून आले. रात्री शांतता भंग करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बापू संतोष सपकाळे (४१, रा. वाघनगर), मयूर राजाराम कुराडे (३१, रा. वाघनगर), दिगंबर पुंडलिक पोहरे (५८, रा. समतानगर), शशिकांत प्रकाश राजपूत (२९, रा. हॉटेल मराठा गार्डन), रवींद्र गणपत मराठे (४७, रा. नेहरूनगर), संजय गणपत मराठे (४६, रा. नेहरूनगर) व संदीप पांडूरंग माळी (४६, रा. नेहरूनगर) यांच्यावर लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच कलम १६०,१८८ व मुंबई प्रो. ऑक्ट कलम ८५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विलास अभिमन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar