काँग्रेसच्या तीन तालुकाध्यक्षांसह सरचिटणीस निवडीस मान्यता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्ह्यातील तीन सरचिटणीस आणि तीन तालुकाध्यक्ष यांच्या निवडीस मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये जमील शेख शफी शेख यांची दुसऱ्यांदा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी सर्व कार्यकारणी बरखास्त केलेल्या होत्या. त्यानंतर नवीन कार्यकारिणी घोषित करण्यासाठी तीन सरचिटणीस आणि तीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावाला रविवार दि.२८ रोजी मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जमील शेख शफी शेख (सरचिटणीस, प्रशासन), मनोज मानसिंग सोनवणे (सरचिटणीस, संघटन), ज्ञानेश्वर शेनपडु कोळी (सरचिटणीस, जनसंपर्क) यांची तर बोदवड, मुक्ताईनगर व चोपडा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अनुक्रमे भरत त्र्यंबक पाटील, दिनेश सोपान पाटील आणि प्रदीप निंबा पाटील यांची निवड झाली आहे.

आगामी काळात जिल्ह्यातील इतर कार्यकारिणी जाहीर होईल. आगामी काळात काँग्रेस पक्षाला अधिकाधिक संजीवनी देण्यासाठी तसेच पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया जमील शेख यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -