राष्ट्रवादी महिला आघाडीच्या यावल तालुका अध्यक्षपदी प्रतिभा निळं यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी महिला आघाडीची संघटनात्मक बैठक २२ रोजी पार पडली. त्यात यावल तालुका अध्यक्ष प्रतिभा गुणवंत निळं यांची निवळ करण्यात आली. ही निवळ महिला जिल्ह्याअध्यक्ष वंदना चौधरी यांनी केली. याप्रसंगी प्रतिभा निळं यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महिला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विजयाताई पाटील उपस्थितीत होत्या.

प्रतिभा निळं ह्या यावल तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून यावल तालुक्यात महिला आघाडीचे काम सांभाळत होते. व बामनोद गावात ग्रा.प.सद्स्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रतिभा निळं यांची तालुका अध्यक्ष तर महिला कार्याध्यक्ष मोहराळा ग्रा.प.सरपंच नंदा गोपाळ महाजन यांची निवड तर यावल शहर अध्यक्ष म्हणून नीलिमा विजय धांडे तर शहर कार्याध्यक्ष म्हणून शामल भावसार यांची निवड करण्यात आली.

यांनी शुभेच्छा दिल्या 

निवडीबद्दल यावल तालुक्यातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एडवोकेट देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष शशांक दादा देशपांडे, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रतिनिधी गिरधर पाटील, आदिवासी आघाडीचे नेते एम.बी. तडवी, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सुखदेव बोदळे, माजीनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,माजीउपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते, राष्ट्रवादीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, यावल युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, किशोर पाटील, पवन पाटील, गिरीश पाटील, विनोद पाटील, भरत चौधरी, सागर सोनवणे, यांच्यसह जिल्ह्यातून जिल्ह्या अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, रोहिणीताई खडसे, माजी मंत्री सतिश अण्णा पाटील, राजेश वानखेडे, माजी आमदार संतोष चौधरी, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, ओबीसी जिल्ह्याअध्यक्ष उमेश नेमाडे, रामदादा पवार, विनोद देशमुख विजय पाटील, सौखेडा, जिल्ह्यायुवक अध्यक्ष रवींद्र पाटील, मंगला पाटील, शेख कुरबान, आदींनी प्रतिभा गुणवंत निळं व आदी महिला पदाधिकारी यांना निवडीबद्दल अभिनंदनासह भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज