fbpx

अखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । जळगाव महापालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन तहसीलदार नामदेव पाटील यांनी तब्बल ११ महिन्यांहून अधिक काळ जळगाव तहसीलदारपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला. अखेर शासनाने नुकतेच त्यांना जळगाव तहसीलदारपदी नियुक्तीचे आदेश दिले आहे.

तहसीलदार वैशाली हिंगे यांची २६ ऑक्टोबर २०२० रोजी शासनाने सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार येथे उपसचिव म्हणून बदली केल्यानंतर मनपा क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जळगाव तहसीलदारपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांची शासनाने १४ सप्टेंबर रोजी जळगाव मनपा क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजना तहसीलदारपदी बदली केली.

त्यानंतर पाटील यांच्याकडे मूळ व अतिरिक्त असे दोन्हीही पदभार राहिलेले नव्हते. त्यामुळे कुळ कायदा शाखेचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडे जळगाव तहसीलदारपदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. देवरेंच्या बदलीच्या आदेशात तहसीलदार पाटील यांच्या प्रस्तावित बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर बदली केल्याचे नमूद केेले होते. पाटील यांची प्रस्तावित बदली जळगाव तहसीलदारपदी असल्याचे शासनाच्या आदेशानंतर स्पष्ट झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज