fbpx

जळगाव मनपाला मिळाले पूर्णवेळ नगररचनाकार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहर मनपाला पूर्णवेळ नगररचनाकार मिळाले असून अशोक करवंदे यांनी आज पदभार स्विकारला आहे. दि.२ रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश झाले होते.

शहर मनपातील नगररचना विभागाला आजवर पूर्णवेळ नगररचनाकार मिळाले नव्हते. शासनाने दि.२ ऑगस्ट रोजी नगररचनाकार म्हणून अशोक पांडुरंग करवंदे यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी करवंदे यांनी पदभार स्विकारला. करवंदे यांनी आजवर पिंपरी चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे ग्रामीण याठिकाणी विविध पदांवर कर्तव्य बजावले आहे.

मंगळवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी नगररचनाकार अशोक करवंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कमी होऊन नगररचना विभागाचे काम अधिक पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच जळगाव मनपा स्वयंभू करण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt