चाळीसगावमधून १६ उमेदवारांचे अर्ज वैध ; आता उत्सुकता माघारीची

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बुधवारी छानणी झाली. त्यात १६ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले आहे. त्यामध्ये विद्यामान खासदार, आमदारांसह माजी आमदार आणि राजकीय पक्षातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. उमेदवाराला कोणत्या पॅनलमधून उमेदवारी मिळते. आणि १६ मातब्बरांपैकी कोण, कोण माघार घेतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सविस्तर असे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात जिल्ह्यातील इतर काही तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील निवडणूक बिनविरोध हाेत असताना, चाळीसगाव तालुक्यात मात्र, मातब्बर लढतीसाठी समाेरासमाेर उभे ठाकले आहेत. निवडणुकीत तालुक्यात प्रचंड चुरस दिसून येत आहे. विविध कार्यकारी सेवा संस्था गटासह सहा गटांमधून तालुक्यातून एकूण १६ मातब्बरांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या काही निवडणुका बघता पहिल्यांदाच तालुक्यातून एवढे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बुधवारी झालेल्या छाननीत तालुक्यातील १६ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले. त्यामुळे १६ मातब्बरांपैकी कोण कोण माघार घेतो, हे माघारीनंतर स्पष्ट होईल.

 

यांनी दाखल केले अर्ज

चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा संस्था गट- माजी आमदार, विद्यमान संचालक राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, प्रमोद पाटील, आमदार मंगेश चव्हाण, भारती विनोद पाटील, खासदार उन्मेष पाटील

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गट- विद्यमान संचालक राजेश राठोड, माजी जि.प. सदस्य मंगेश पाटील, रविंद्र पाटील
अनुसुचीत जाती जमाती गट- बाबुलाल मोरे

इतर मागासवर्ग प्रवर्ग- चाळीसगाव कृऊबाचे माजी सभापती व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, कैलास सूर्यवंशी, काॅँग्रेस तालुकाध्यक्ष आाबासाहेब निकम

महिला राखीव गट – लिलाबाई पाटील इतर संस्था व व्यक्तीगत सभासद गट- खासदार उन्मेष पाटील व काॅँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब निकम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज