fbpx

मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतंर्गत 18 मार्च, 2021 रोजी मिळालेली एक चार वर्षीय बालिका जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये शिशुगृह, धुळे येथे दाखल करण्यात आली आहे.

या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती (अध्यक्ष) धुळे या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 02562/247123 वर संपर्क साधावा. असे विजयसिग परदेशी, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज