fbpx

जनआक्रोश संघटनेची कार्यकारिणी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेची जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

संघटनेच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी वैद्य गणेश घोपे, जिल्हा कार्याध्यक्ष हिम्मतराव पाटील, मुख्य सचिवपदी विनोद बेरभैया, संपर्कप्रमुखपदी अतुल महाजन, सल्लागारपदी ऍड. प्रवीण पाटील, महानगर अध्यक्षपदी दिलीप साळुंखे आदींची निवड करण्यात आली. बैठकीत राज्य उपाध्यक्ष शेख गुलाब ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱयांना एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी अशी मागणी करून जिल्ह्यात कुठेही भ्रष्टाचार, अन्याय आणि अत्याचार होत असेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क करून त्या विषयी माहिती द्यावी असे आवाहन केले. बैठकीस उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज