जिद्द, मैत्रीच्या बळावर साकारलेले शौर्य गीत ‘अण्णाभाऊ लाल सलाम’

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । एखाद्या कलाकाराने मनात निर्धार केला की तो ती गोष्ट साध्य करूनच राहतो. मूळ पाचोऱ्याच्या असलेल्या शाहीर तुषार पुष्पदीप सूर्यवंशी या तरुणाने अवघ्या २५ दिवसात स्वतः आर्थिक खर्च करून वॉललेस प्रिजन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती आणि मित्र परिवाराच्या बळावर ‘शोषितांचा आण्णाभाऊ लाल सलाम’ हे शौर्य गीत साकारले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ते प्रदर्शित करण्यात आले.

नेहमी धडपड्या असलेल्या तुषार सूर्यवंशी या तरुणाच्या आईचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. घरात आता केवळ दोन भावंड आणि एक बहिण असा छोटासा पण अपूर्ण परिवार. समाजाची जाणीव असल्यामुळे दुःखातून उभारण्यासाठी आणि समाजात एक सांस्कृतिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र आणि वॉललेस प्रिजन यांच्या मदतीने कुठलेही भांडवल नसतांना स्व – खर्चाने अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित शोषितांचा आण्णाभाऊ लाल सलाम हे गीत लिहून एक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केला आहे.

गाण्याचे चित्रीकरण धुळे येथील एका गावात पार पडले. त्याठिकाणी देखील काही समाज कंटकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.

गाणे साकारताना गीतकार/गायक – तुषार पुष्पदिप सूर्यवंशी, कोरस – शरद वेंदे, सिद्धांत बागुल, प्रसेंनजित जगदेव
निर्माता – स्वाती संजय त्रिभुवन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, वॉललेस प्रिजन यांचे सहकार्य लाभले.

गाण्याचे लोकार्पण काँ.नजूबाई गावित, सिद्धार्थ अण्णा जगदेव, प्रा.महेंद्र कुमार वाडे आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे युनिट व इतर मित्र परिवार शीतल पाटील, रोहिणी जगदेव, जितेंद्र अहिरे, राकेश अहिरे, स्वाती त्रिभुवन यांच्या उपस्थितीत धुळे येथे करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शौर्य गीत समाजाला अर्पण करण्यात आले आहे.

संपूर्ण गीत ऐकण्यासाठी क्लीक करा : –

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -