fbpx

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजनच

पुणे येथील धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा निर्णय

mi-advt

 माळी समाजाची ३८ वर्ष  सर्वात जुनी आणि अधिकृत संघटना ही महाराष्ट्र माळी समाज महासंघ आहे. १९८३ पासून हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी अस्तित्वात आहे. माळी समाजातील यशस्वी अनेक मान्यवरांना या महासंघात काम करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान दिनांक १८/१०/२०१८ रोजी नाशिक येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. संस्थेच्या सर्व अधिकृत सभासदांनी एकत्र येऊन  एकूण ११ लोकांची विश्वस्त म्हणून निवड केली व नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले.यात अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी.माळी, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, दीपक महाजन, शोभा रासकर, पौर्णिमा महाजन ,डॉ.विना कावलकर, अजय गायकवाड, काशिनाथ जाधव.यांची विश्वस्त पदी निवड केली होती व सर्व नवनियुक्त विश्वस्त यांनी मिळून प्रदेश अध्यक्ष पदी अनिल महाजन यांची निवड केली होती. त्याचा अधिकृत चेंज रिपोर्ट दिनांक २७/११/२०१८ रोजी पुणे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

मागील विश्वस्त बॉडी मधील माधवराव हुडेकर ,विजयराव बोरावके,भानुदास राऊत  व  यांच्यासोबत अजून काही वयस्कर मंडळींनी चुकीच्या व  अज्ञान व्यक्तीचे ऐकून चेंज रिपोर्टवर लेखी हरकत घेतली होती. अनिल महाजन व नवीन विश्वस्त यांची निवड बेकायदेशीर आहे असा आरोप या लोकांनी केला होता. त्याचे कारण हे होते की, महाराष्ट्र माळी समाज महासंघाकडून काम न करणाऱ्या व रीतसर मुदत संपलेल्या या जुन्या लोकांना सभासदांच्या मागणी वरून मागील विश्वस्तांना सर्व पदावरून कमी करण्यात आले आहे.यामुळे वयस्कर मंडळींनी बदल अर्ज मंजूर करण्यात येऊ नये म्हणून हरकत घेतली होती.

अखेर अनिल महाजन यांच्या कार्याची दखल घेत पुणे धर्मादाय न्यायालयाने दिनांक १८/१०/२०१८ रोजी झालेले नाशिक येथील  वार्षिक सर्व साधारण सभेचे इतिवृत्त व पुरावे बघितले. आतापर्यंत अनिल महाजन यांनी केलेल्या कामाचे स्वरुप बघितले. सर्व कायदेशीर नियमानुसार रेकॉर्ड आढळून आले.समोरील हरकतदाराचे म्हणणे ही कोर्टाने  ऐकून घेतले. तब्बल अडीच वर्षे धर्मादाय आयुक्त पुणे  यांच्या न्यायालयात सदर चेंज रिपोर्ट ( बदल अर्जा बाबत ) खटला चालला. हरकतदारांचे  हे कुठल्याही प्रकारे ठोस पुरावे देऊ शकले नाही. महासंघासाठी हरकतदारांचे  कुठलेही  ठोस कार्य दिसून आले नाही. त्यामुळे पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाच्या राहुल चव्हाण यांच्या सहका ऱ्यांनी  हरकतदारांचा अर्ज फेटाळला व अनिल महाजन यांच्यासह एकूण विश्वस्त असलेले १० लोकांचा बदल अर्ज गुणवत्तेच्या आधारावर मेरिट वर  मंजूर करण्यात आला.धर्मादाय आयुक्त पुणे न्यायालयाचा आदेश  राहुल चव्हाण  यांच्या सहीनिशी दिनांक ०१/०४/२०२१  एप्रिल रोजी पारित करण्यात आला आहे.अनिल महाजन यांच्या तर्फे ॲड. डी.डी शहा यांनी काम पाहिले.तर हरकतदार यांच्यातर्फे ॲड श्री.टिळेकर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज