fbpx

अनिल चौधरींच्या हद्दपारी प्रस्तावावर बुधवारी कामकाज

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावरील चौकशीसाठी शनिवारी भुसावळ डीवायएसपी कार्यालयात कामकाज होते. मात्र, चौधरींनी तोंडी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतल्याने त्यांना २५ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली.

चौधरींच्या हद्दपारी प्रस्तावाची डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्यासमोर चौकशी सुरू आहे. तत्पू्र्वी, चौधरींनी उच्च न्यायालयात दाखल अपिल मागे घेतले होते. तर न्यायालयाने या प्रस्तावाची लवकरच चौकशी करून निष्कर्ष काढावा, असे आदेश दिले. शनिवारी चौधरींनी डीवायएसपींकडे हजर होत तोंडी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज