fbpx

जळगावातील लाचखोर प्रकल्प अधिकार्‍याची पोलिस कोठडीत रवानगी

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसीडी योजनेचा लाभ मिळण्याचे प्रकरण अपलोड करून हे प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागणार्‍या जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच कार्यालयातच अटक केली होती.

संशयीत आरोपीस बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आनंद देविदास विद्यागर (50, रा.अजय कॉलनी, रिंग रोड, जळगाव) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

mi advt

जिल्हा उद्योग केंद्रातच स्वीकारली होती लाच

भुसावळ तालुक्यातील 35 वर्षीय तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार आहेत. त्यांनी पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसीडी योजनेचा लाभ मिळण्याकामी प्रकरण सादर केले होते मात्र हे प्रकरण बँकेस पाठविण्यासह अपलोड करण्याच्या मोबदल्यात आरोपी आनंद विद्यागर यांनी 15 रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून कार्यालयात लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपीस बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज