विजेच्या धक्क्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील ६८ वर्षीय वृध्दाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची शनीवारी सायंकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास नथ्थु पाखले (वाणी) असे मयत वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

निंभोरा बुद्रक येथील कैलास पालखे हे शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हाताला वायरचा स्पर्श झाल्याने त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले. तातडीने त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असत वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले.

या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे हे तपास करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार असून ते नाशिक येथील प्रमोद व सुधाकर कैलास पाखले यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -