डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरीचा प्रयत्न असफल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ ।  पेट्रोल पंपाची ८१ हजार ५०० रुपये किमतीचा भरणा दुचाकीने बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यात मिरची पुड फेकून पैशाची बॅग लांबविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या तरुणाच्या धाडसामुळे चोरांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला शुक्रवारी ३ सप्टेंबर २१ रोजी दुपारी ही घटना घडली.

 

ज्या स्थळी पैसे चोरीचा प्रयत्न झाला त्या परिसरातील हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले परंतु मर्यादित क्षेत्रात कव्हरेज घेत असल्यामुळे आरोपी निष्पन्न होऊ शकले नाहीत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील पेट्रोल पंपाचा भरणा भरण्यासाठी मनोज सुनील देवरे हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी एम.एच१९ बि यु ५३०७ क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना वाटेवर तीन माणसे त्याला हाताचा इशारा देऊन थांबण्यास सांगत होते. परंतु तो न थांबल्यामुळे तिघांपैकी एकाने देवरे च्या दुचाकीला हात मारला व त्याच्या साथीदाराने देवरे याच्या तोंडावर मिरचीची पूड टाकली तर तिसऱ्या साथीदाराने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण देवरे याने तिघा आरोपींना न जुमानता व जीवाची पर्वा न करता एरंडोल शहराकडे दुचाकी पैशांच्या बॅंगसह नेली.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -