शेत पाणंद रस्त्यांसाठी मिळणार ३ लाख रुपये प्रती किलोमीटर रक्कम

 जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ ।  आपण राज्यमंत्री असताना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर त्याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यात या प्रकारातील रस्ते तयार हाेत आहेत. आतापर्यंत प्रति किलोमीटरला एक लाख रूपये तरतूद होती. मात्र, यापुढे जिल्हा नियोजनमधून हीच रक्कम आता तीन लाख रूपये प्रति किलोमीटर इतकी वाढवता येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोनगाव खुर्द ते खेडी दरम्यान, सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बाेलत हाेते.

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी ही कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी या शेत रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. आज दोनगावला एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी थेट दुचाकीवरून सुरू असलेले ठिकाण गाठून कामाची पाहणी केली. त्यांनी या कामाला वेग देण्याचे निर्देश देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

यांची उपस्थिती होती 

याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, किशोर पाटील, सुरेश पाटील, ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज