रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाच्या खोडामुळे अपघात; कारचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील तोडण्यात आलेल्या वडाच्या झाडाच्या खोडामुळे अपघात होऊन यात कारचे नुकसान झाल्याची घटना शनिवार दि.१६ रोजी घडली.

शहरातील नवीन कानळदा रोडवरील राधाकृष्ण नगरात रस्त्याच्या मधोमध असलेले वडाचे झाड तोडण्यात आले आहे. झाड तोडून अनेक दिवस उलटल्यानंतरही त्या झाडाचे खोड व मूळे येथेच आहेत. दरम्यान शनिवार दि.१६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अतुल शिरसाळे हे काम आटोपून त्याच्या कारने घरी जात असताना रात्री अंधारात त्यांना हे खोड दिसून आले नाही. त्या खोडावर कार चढल्याने यात कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

नगरसेवकाचे कार्यालय असूनही खोड जैसे थे
ज्या ठिकाणी हे खोड आहे त्याच्याचसमोर नगरसेवक दिलीप पोकळे यांचे कार्यालय आहे. झाड तोडून अनेक दिवस होऊन देखील हे खोड तसेच असल्यामुळे या ठिकाणी अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे हे खोड तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज