अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का? ; अवघ्या काही तासात मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना त्यानिमित्तानं अमृता फडणवीस यांनी गणेश वंदना हे गाणं गायिले आहे. अवघ्या काही तासात या गाण्याला लाखांच्या वरती व्हिव्ह मिळाला आहे.  नेटकऱ्यांनी त्यांच्या या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असल्याचं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना एकीकडे घरातील स्त्रीला कामावर रुजू होण्यासाठी बोलावणं येतं. ही स्त्री डॉक्टर आहे. घरातील जबाबदाऱ्या पार पाडून ती रुग्णालयात रुग्णसेवेसाठी सज्ज होते. तिच्या कुटंबातील इतर लोकही तिला पाठिंबा देतात, असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर या गाण्याची छोटीशी झलक ट्वीट केली आहे. नेटकऱ्यांनी लगेचच या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अमृता फडणवीस यांचा आवाज सुरेख असल्याची दाद दिली आहे. तर, काहींनी गणपती बाप्पाला नमन केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. आता अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -