प्रवाशांना दिलासा! अमरावती-सुरत रेल्वेगाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीनंतर परतीचा प्रवास, लग्नसोहळ्यांना सुरुवात झाल्याने रेल्वेगाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला असून दर रविवारी आणि शुक्रवारी ही गाडी धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेच्या अनलाॅक प्रक्रियेनंतर मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातून अनेक गाड्या सुरू झाल्या. यात बडनेरा आणि इटारसी या दाेन मेमू गाड्यांचा समावेश आहे. आता प्रवाशांची वाढत जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने अमरावती-सुरत ही गाडी सुरू केली आहे. यामुळे सुरतला जाणाऱ्या व सुरतमधून अमरावतीकडे येणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

असे आहेत वेळेचे नियोजन

२०९२५ क्रमांकाची अतिजलद द्वि-साप्ताहिक गाडी रविवारपासून (दि.२१) प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी दुपारी १२.२० वाजता सुरत येथून सुटेल. ही गाडी अमरावती येथे त्याच दिवशी रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. २०९२६ अतिजलद द्वि-साप्ताहिक अमरावती-सुरत गाडी २२ नाेव्हेंबरपासून प्रत्येक सोमवार आणि शनिवारी सकाळी ९.०५ वाजता अमरावती येथून सुटून दिवशी सायंकाळी ७.०५ वाजता सुरतला पोहोचेल. साधारणत: दीड वर्षानंतर ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरू हाेत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

असे आहेत थांबे
बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, उधना जंक्शन असे थांबे आहेत.

या गाडीला १ वातानुकूलित चेअरकार, ४ द्वितीय श्रेणी चेअरकार आणि १२ द्वितीय आसन श्रेणीचे डबे या रेल्वेगाडीला असणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज