fbpx

पाचोरा, भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ ।  पाचोरा आणि भडगाव  तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे जळगाव येथून पाचोरा-भडगाव -चाळीसगाव येथे वाटप करणाऱ्या वाहनांना आता मोफत पेट्रोल-डिझेल मिळणार असून त्यासाठी रिलायन्स इंडसट्रिज लिमिटेड व पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंप चे संचालक रुपेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स पेट्रोलपंप पाचोरा यांच्या माध्यमातून आता कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आन करणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिकांना व  ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रति दिन प्रती वाहनास पन्नास लिटर मर्यादे पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल रिलायन्स पेट्रोल पंप, पाचोरा येथे मोफत टाकून मिळणार आहे.

याकरिता रुग्णवाहिकांना व अत्यावश्यक वाहनांना तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी  याचे साक्षांकित पत्र घेणे आवश्यक आहे.या उपक्रमाची सुरुवात खासदार उन्मेष पाटील, कृ.उ.बा. समिती चे मा. सभापती सतिष शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी खासदार पाटील यांनी रुपेश शिंदे यांचे भरभरून कौतुक करून या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल व गरजू रुग्णांना कमी खर्चात इतर ठिकाणी जाऊन उपचार घेता येईल असे सांगितले. भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ऍम्ब्युलन्स चालकांना करोना व्यक्ती साठी भाडे कमी आकरण्याचे आवाहन केले. तसेच सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी कटिबद्ध राहू असे रुपेश शिंदे यांनी बोलताना सांगितले व रिलायन्स कंपनीचे CEO  मुकेश अंबानी यांचे आभार मानले.

या प्रसंगी तहसीलदार कैलास चावडे ,जिल्हा चिटणीस  सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष  रमेश वाणी,नगरसेवक योगेश पाटील, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ पाचोरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमित साळुंके,भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील,भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव,भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज