जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : रुग्णवाहिकेतून येत चोरीचा प्रयत्न करणारे पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : रुग्णवाहिकेतून येत चोरीचा प्रयत्न करणारे पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेतून येत चारचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या आहे. पोलिसात गुन्हा दाखल होण्यापूर्वी जळगाव लाईव्ह न्यूजने दिलेल्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी तपासचक्रे फिरवून काही तासात रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

भुसावळ येथील कुणाल रामदास हटकर हे जळगावातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या छाबडा सर्जिकल दुकानात काम करतात. हटकर हे ऑफिसच्या कामानिमित्त दि.२५ रोजी स्वतःची चारचाकी क्रमांक एमएच.१९.बीजे.०५५४ ही गोल्ड सिटी हॉस्पिटलसमोर लावून इंदोर येथे गेले होते. रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेतून आलेल्या दोघांनी चारचाकी लंपास करण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

शहर पोलिसात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तक्रारदाराकडून माहिती घेत जळगाव लाईव्ह न्यूजने सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेजसह वृत्त प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण, नेत्रम शाखेचे कुंदन बयास यांनी तपासचक्रे फिरवीत दोघांना रुग्णवाहिका क्रमांक एमएच.२४.सी.६८७१ सह ताब्यात घेतले आहे.

चारचाकीचे वायपर आणि आणखी एका चारचाकीचे साईड मिरर चोरट्यांनी लंपास केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे योगेश संजय बाजड, रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड रा.वाघनगर असे आहे. याप्रकरणी कुणाल हटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संतोष खवले करीत आहे. दोघांनी यापूर्वी देखील काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -