अमळनेरात “दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जयघोष ने सांगता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील स्वामी समर्थ केंद्रात श्रीदत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम करत पूजा पाठ व गुरुचरित्र पारायण वाचन करण्यात आले. यावेळी “दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जयघोष ने सांगता करण्यात आली.

१२ डिसेंबर पासून सामूहिक गुरू चरित्र पारायण पठण करून गेल्या सात दिवसांपासून अखंड पणे सेवा सप्ताह पाळण्यात आला. आज शनिवार दुपारी १२ वाजून ३९वी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.भाविकांनी “दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या मंत्रोचाराचा जयघोष करत स्वामींचे दर्शन घेतले. दत्तजयंती निमित्ताने मंदिरावर विविध प्रकारची रोषणाई व सजावट केली होती.परिसरासह तालुक्यातील शेकडो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय गुरव यांचा भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम झाला.

यावेळी अनेक भाविक भक्तांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या दिल्यात आणि शेवटी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व सेवेकरी बंधूंचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar