fbpx

अमळनेरात अवतरणार अत्याधुनिक जलतरण तलाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा,पाडळसरे प्रकल्पासाठी 140 कोटी,क्रीडा संकुलासाठी 5 कोटी,शहरात वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत अडीच कोटी यासह ग्रामिण रस्ते आणि बंधाऱ्यांसाठी भरीव असा निधी उपलब्ध करणाऱ्या आमदार अनिल पाटलांनी तरुणाईला विशेष आकर्षण असणाऱ्या जलतरण तलावास प्रशासकीय मान्यता मिळविली असून तब्बल 2 कोटी 56 लक्ष निधीतून हा अत्याधुनिक पद्धतीचा जलतरण तलाव अमळनेरात अवतरणार आहे.

विशेष म्हणजे जळगाव,धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यात एकमेव अमळनेरातच या जलतरण तलावास मंजुरी मिळाल्याने महाविकास आघाडी सरकार अमळनेर मतदारसंघावर खरोखरच विशेष मेहरबान असल्याचे आमदारांनी सिद्ध केले आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर हद्दीत हा जलतरण तलाव साकारला जाणार आहे.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत अमळनेर पालिकेस ही मंजुरी मिळाली असून या बाबतचा शासन आदेश दि 27 मे 2021 रोजी संबधित विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री ना.आदीतीताई तटकरे यांच्या सहकार्याने ही मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.तसेच ही प्रशासकीय मान्यता असून आता निधीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना अजितदादा पवार यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा करून लवकरच निधीची उपलब्धता करत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे संकेत आमदारांनी दिले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यास मिळणार चालना

पूर्वी अमळनेर म्हणजे नामांकित खेळाडूंची भूमी होती कुस्ती असो किंवा कोणतेही खेळ असो अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण होऊन  राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी मजल मारली होती,खेळाडूंची ही खंडित झालेली परंपरा पुन्हा प्रज्वलित करण्याची धरपड आमदारांची असून हा जलतरण तलाव त्याचाच एक भाग आहे.याआधी अमळनेर येथील प्रलंबित असलेल्या तालुका क्रीडा संकुलाकडे देखील आमदारांनी लक्ष वेधून स्वखर्चासह इतरांच्या सहकार्याने  स्वच्छतेसह ट्रॅक व विविध मैदानांची निर्मिती केल्याने हे क्रीडा संकुल खेळाडूंनी फुलू लागले असून लवकरात लवकर हे क्रीडा संकुल पूर्णत्वास आणण्याचा ध्यास आमदारांचा आहे त्यासाठी नुकतीच 5 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता आमदारांनी मिळविली असून तो निधी उपलब्ध करण्यासाठी देखील जोमाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.तरुणाईला क्रीडा सुविधा निर्मितीच्या उद्देशानेच आमदारांनी हा जलतरण तलाव प्राधान्याने मंजूर करून आणला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निर्माण करण्यास चालना देणे हा च या योजनेचा उद्देश आहे,या योजनेंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे क्रीडा साहित्यासाठी  आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे.सदर जलतरण तलावामुळे खेळाडू निर्माण करण्यास चालना मिळण्यासोबतच स्विमिंग तथा जलतरण या विशेष फायदेशीर व्यायामाची देखील अमळनेरात सोय होणार आहे. सदर प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांना अमळनेर न प च्या नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व नगरसेवक यांचेही सहकार्य लाभत असल्याचे आमदारांनी सांगितले.

अत्याधुनिक स्विमिंग पूल पाहण्यासाठी अमळनेरातुन जाणार टीम

यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की सुमारे 2.56 कोटी निधीतून होणारा हा जलतरण तलाव संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीचा होऊन त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी राज्यातील काही चांगले जलतरण तलाव पाहण्यासाठी आणि त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या टीमला पाठविण्याचे नियोजन आपण करीत असून सदर जलतरण तलाव नेमका कुठे सकारावा यासाठी नगराध्यक्षा आणि पालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार आहोत,सदर जलतरण तलावात महिला,पुरुष व लहान बालकांसाठी स्वतंत्र सोय असणार असून लहान मोठ्या स्पर्धाही भविष्यात येथे होऊ शकतील,पाण्याची उपलब्धता,रिसायकलिंग,शुद्धीकरण आदी संपुर्ण बाबी विचारात घेऊन आणि राज्यातील चांगले जलतरण तलाव डोळ्यासमोर ठेवून आणि यातील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन हा प्रकल्प लवकरच निर्माण करून अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज