अमळनेरला दोघांवर चाकू हल्ला, हवेत दोन राउंड फायर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथे क्षुल्लक कारणावरून भांडण होऊन हाणामारी झाली. हाणामारीत एकाने दहशत माजविण्यासाठी दोघांवर चाकूहल्ला करीत हवेत गोळीवर केल्याने परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. चाकूहल्ला आणि गोळीबारची घटना दि.२२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिरूड नाका परिसरातील कन्हैया चौकात घडली.

दीपक गणेश पाटील याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बाहेरून आल्यानंतर चौकात शिवाजी महाराजांच्या बोर्डाजवळ चबुतऱ्यावर कुणीतरी थुंकलेले दिसले. म्हणून त्याने तेथे असलेल्या शुभम शेटे व मनोज बिऱ्हाडे यांना याबाबत विचारले. त्याचा राग आल्याने मनोजने हुज्जत घालत करून कुणाला तरी फोन लावले. त्यानंतर अरविंद बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, गौतम मंगल बिऱ्हाडे, विशाल सोनवणे व इतर चार ते पाच जण आले. या वेळी गौतमच्या हातात चाकू होता. त्याने तू माझ्या भावाशी का वाद घातला, असे विचारून मनोजने चाकू काढला व मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. दीपक याने तो डाव्या हातावर घेतला. त्यानंतर दीपक जीव वाचवण्याकरता पळू लागला. या वेळी विशाल, अरविंद, शुभम यांनी त्यास धरून ठेवले व मनोज आणि गौतम यांनी चाकूने दीपकच्या पाठीवर वार केला. तेव्हा दीपकचा मित्र चेतन, संजय पाटील, पवन बडगुजर, अशोक पाटील हे मदतीसाठी धावून आले. याच वेळी गौतमचा वार चेतनच्या उजव्या हातावर लागला. त्यात त्यालाही गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दहशतीसाठी हवेत गोळीबार करण्यात आला. तेव्हा गल्लीतील लोक पळू लागले होते. या प्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध दंगल व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व शस्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, या घटनेत विशाल सोनवणे याचा सहभाग नव्हता, असा दावा विशाल व त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याला विनाकारण अडकवले जात असल्याची कैफियत त्याची आई व पत्नीने प्रांत सीमा अहिरे यांच्याकडे मांडली. यानंतर त्यांनी अप्पर पाेलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी योग्य चौकशीचे आश्वासन दिले. रात्री पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना दोन फायर केलेले खाली राउंड आणि रक्त सांडलेले दिसले. दरम्यान, जखमी दीपक व चेतन यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान, विशालने काहीतरी द्रव्य प्राशन केल्याने त्याची प्रकृती बिघडली असून त्यालाही डॉ.शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेचा तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करत आहेत. दिवसभर डॉ.अनिल शिंदे यांच्या रुग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त होता.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -