fbpx

अमळनेर येथून अल्पयीन मुलीला फूस लावून पळविले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | अमळनेर तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर बसस्थानकाहून एकाने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय तरूणी ही २५ ऑगस्ट रोजी आपल्या आजीसोबत गावाला जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकात पोहचल्या. बसस्थानकात असतांना स्वच्छतागृहातून जावून येते असे सागून अल्ववयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून दुचाकीवर बसून पळवून नेला.

हा प्रकार मुलीच्या आजीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपीचंद पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज