खडसेंच्या अटकेच्या सर्व अफवा : अ‍ॅड. रोहिणी खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । ईडीच्या पथकाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अटक केली, त्यांना समन्स बजावले असे संदेश सोशल मिडियात फिरत असून ते सर्व अफवा असल्याची माहिती खडसेंच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली आहे.

ईडीच्या पथकाने सोमवारी पुणे येथून तत्कालीन उपनिबंधकाला अटक केली तर इतरांना चौकशीसाठी समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागून घेतली आहे. जळगावात दुपारपासून दिग्गज नेत्याला ईडीने अटक केल्याचे संदेश सोशल मीडियात फिरत आहेत. विरोधकांचा रोख एकनाथराव खडसे आणि कुटुंबियांकडे असला तरी असा कोणताही प्रकार नसल्याचे त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. अ‍ॅड. रोहिणी खडसे म्हणाल्या कि, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कामानिमित्त जळगावच्या बाहेर आहेत. सध्या सोशल मिडियात सुरु असलेल्या चर्चा या निव्वळ अफवा असून अटक किंवा समन्सचा कोणताही प्रकार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज