fbpx

पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचीत राहू नये – खासदार उन्मेश  पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज | १ सप्टेंबर २०२१ | नुकसानग्रस्त व्यापारी, लोटगाडी धारक, भाजीपाला व्यापारी, इतर व्यावसायिकांनी मांडलेली कैफियत आणि प्रशासनाने पंचनामे बाबत घेतलेली भुमिका यात समन्वय ठेवावा. अतिवृष्टीने दुर्दैवी प्रसंग ओढवला असुन वराह, घोडे, गायी, शेळी, मेंढीसह अनेक पाळीव प्राणी, घरांची पडझड, वाहून गेलेले भांडी कुंडी संसारपयोगी सामान या सर्वांचा पंचनामा वस्तुनिष्ठ करावा. राज्य सरकारने कोकणच्या धर्तीवर मदत मागितली आहे. भविष्यात पंचनामा नसल्याने एखादा नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वकपणे पंचनामे करून घ्यावेत. *आज हे सर्व घटक उध्वस्त झालेले असून एकही नुकसानग्रस्त वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी अशी सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे*.

आज तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, प्रभारी मुख्याधिकारी लांडे साहेब, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटीलतसेच महसूल व नगरपालिका कर्मचारी अधिकारी उपस्थीत होते. तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रास्तविक केले. मुख्याधिकारी लांडे साहेब यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज