ऑल इंडिया रेडिओने घेतली जीएम फाऊंडेशनची दखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून । जिल्ह्यातील जीएम फाऊंडेशनने कोविड काळात केलेल्या कार्याची दखल ऑल इंडिया रेडिओने घेतली आहे. जीएम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख यांची मुलाखत ऑल इंडिया रेडिओच्या मराठी आणि हिंदी वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली.

कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात जीएम फाऊंडेशनने उत्कृष्ट कार्य केले. मास्क, सॅनिटायझर वितरणसह कोविड सेंटरची उभारणी, कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे आणि रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक अरविंद देशमुख व टीमने चोखपणे बजावली. कोविड काळात केलेल्या कार्याची दखल ऑल इंडिया रेडिओने घेतली असून नुकतेच अरविंद देशमुख यांची मुलाखत घेऊन प्रसारित करण्यात आली.

ऑल इंडिया रेडिओच्या विविध माध्यमातून मुलाखत प्रसिध्द करण्यात आली. हिंदी भाषेत देखील मुलाखत घेण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज