fbpx

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहिर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । विविध आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांची तसेच अनुतीर्ण झालेले व आता प्रशिक्षण संपलेल्या उमेदवारांच्या 11 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अशी माहिती अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र व्दारा- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या परीक्षेबाबत आस्थापनांनी 5 जुलै, 2021 पासून कार्यवाही करायची आहे. याची सर्व संबंधित आस्थापना तसेच शिकाऊ उमेदवार यांनी नोंद घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास त्वरीत बीटीआरआय विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र, व्दारा-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज