अलर्ट : पुढील ४ दिवस पावसाची शक्यता, जळगावात बरसल्या सरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । हवामान खात्याने गेल्या आठवड्यात दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाला सुरुवात झाली असून जळगावात देखील सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश नसला तरी जळगावात पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने यापूर्वीच राज्यात येलो अलर्ट जरी केले होते. राज्यातील काही भागात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस होणार असल्याने प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २ दिवसांपासून राज्यात थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी आजपासून ४ दिवस विजांच्या गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

नाशिक येथे दुपारी जोरदार पाऊस झाल्यानंतर जळगावात देखील पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रब्बीला फटका बसण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज