अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । नशिराबाद येथील अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात साजरा झाला. सप्ताहची सुरूवात दिनांक १२ रोजी सुरू होऊन त्याचे पूजन सपत्नीक मुकेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात सर्व कीर्तनकार यांनी समाज प्रबोधन करून कीर्तनात सर्व भाविकांनी मनसोक्त कीर्तनाचा आनंद लुटला. सप्ताह सांगते च्या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी भजन म्हणून सहभाग नोंदविला. तसेच या दिंडी सोहळ्यात सर्वांनी वारकरी वेशभूषा करून टाळ, भजन, मृदंगाच्या गजरात सर्व परिसर भक्तिमय करण्यात आला होता.

यांनी दिल्या शुभेच्छा 

या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती 

सोहळ्यात माझी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, जनार्दन माळी, गणेश चव्हाण तर हभप सुनिल शास्त्री महाराज, प्रभाकर महाराज, पंकज महाराज, प्रमोद महाराज, विशाल महाराज, रमेश पाटील, सुरेश माळी, संजय महाराज, आबा पाटील, अशोक माळी, महेश माळी, मधूकर महाजन, सुनील माळी, संदीप जगताप, सोपान माळी, संतोष पवार, अशोक पवार, भास्कर पाटील, हेमराज महाजन, तेजस माळी, यांच्या सहभाग होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज