fbpx

अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगने वेधले लक्ष!

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर अनेक बॅनर, होर्डिंग्ज लागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेल्या होर्डिंगने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीचे विनोद देशमुख आणि मनोज वाणी यांनी लावलेल्या या शुभेच्छा होर्डिंगवरील ओळी प्रत्येकाला काही क्षण थांबण्यास प्रवृत्त करीत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते ना.अजित पवार यांचा दि.२२ जुलै रोजी वाढदिवस आहे. ना.पवार वाढदिवसानिमित्त जिल्हाभर अनेक बॅनर, होर्डिंग्ज लागले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नवीन बसस्थानकावर लागलेले एक होर्डिंग मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादीत पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झालेले विनोद देशमुख आणि नाथाभाऊंचे कट्टर समर्थक मनोज वाणी यांनी हे होर्डिंग लावून शुभेच्छा दिल्या आहेत. होर्डिंगवर शुभेच्छा देताना काही ओळी मांडण्यात आला असून त्या आपल्या नेत्यावर असलेल्या विश्वास अधिक घट्ट करीत आहे.

mi advt

‘त्या’…. शपथविधीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात दादांच्या ‘निष्ठेबद्दल’ शंका उत्पन्न झाली होती… मात्र आम्ही ठाम होतो… दादा एकवेळ राजकारण सोडतील… पण साहेबांवरील निष्ठा कधीच सोडणार नाहीत… होर्डिंगवर असलेल्या या ओळी वाचण्यासाठी प्रत्येकाला त्याठिकाणी काही क्षण थांबवेच लागत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज