सेवा दलाच्या यावल तालुका अध्यक्षपदी अजय बढे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष आ.विलास औताडे व उपाध्यक्ष अजाबराव पाटील यांच्या आदेशावरून सेवा दलाच्या नवीन नियुक्ती करण्यात आल्या. यात यावल तालुका अध्यक्षपदी अजय बढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती आ.शिरीष चौधरी, आ.उल्हास पाटील, प्रदेश सचिव कोलपकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ( उर्फ ) प्रदीप पवार, सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष आ.संजय पाटील व सेवा दलाचे आ.मनीष नेमाडे यांनी यावलचे अजय रामकृष्ण बढे यांना सेवा दलाचे यावल तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केली.

कार्यक्रमात महानगर अध्यक्ष श्याम तायडे, जिल्हा महिला सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. ईश्वरीताई राठोड, जिल्हा सरचिटणीस शेख जमील, जिल्हा परिषद गट नेते व यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवण, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आ.गणेश बारसे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगारचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रसन्न गुणवंतराव देशमुख, प्रल्हाद भाऊ सोनवणे, गोकुळ चव्हाण, योगिताताई शुक्ला, सकीनाताई तडवी, छाया कोरडे, आमिना तडवी तासेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -