fbpx

जमीयत उलेमा ए हिन्दतर्फे पूरग्रस्तांना मदत

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । येथील जमीयत उलेमा ए हिन्दतर्फे महाड येथील पूरग्रस्त लोकांसाठी गृहउपयोगी अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले.

दर्दमंद तालीम व तरक्की ट्रस्ट महाड़ यांच्यामार्फत गरजू लोकांना वितरित करण्यात येईल. जळगाव जमीयत उलेमा ए हिन्दचे हाफिज मुख्तार पटेल, रागिब अहमद, शेख तबरेज, हाफिज दानिश, वसीम पटेल हे मदत घेऊन १६ रोजी महाड़ येथे पोहोचले. मुफ़्ती अतीकुर्रहमान यांच्या मार्गदर्शनात मस्जिदित ही मदत गोळा करण्यात आली होती.
अंजुमन दर्दमंद तालीम व तरक्की महाड़ या संस्थेचे अध्यक्ष मुफ़्ती रफ़ीक़ पूरकर व ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुफ़्ती मुजफ्फर सेन यांनी मदत स्विकारली. जमीयत उलेमा ए हिन्द जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त राजेवाड़ी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज