खान्देशी कलाकारांची अहिराणी ‘गाडी पोम, पोम’ युट्युबवर सुसाट

जळगाव लाईव्ह न्यूज । विष्णू मोरे । जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात सध्या अहिराणी गाण्यांची क्रेझ वाढली आहे. दररोज नवनवीन गाणे बाजारात येत आहेत. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील काही तरुण कलाकारांनी तयार केलेले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतांना दिसून येत असून खान्देशी कलाकारांची ‘गाडी पोम, पोम’ युट्युबवर सुसाट निघाली आहे. अवघ्या एका दिवसात गाण्याचे २५ हजार व्ह्यूवर्स झाले आहेत.

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील खान्देशी कलाकारांनी तयार केलेले ‘गाडी पोम, पोम’ हे गाणे दि.२४ सप्टेंबर रोजी युट्यूब माध्यमातून रिलीज करण्यात आले. या गाण्याला एका दिवसातच रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. कैलास कुंभार व संतोष कुंभार हे या गाण्याचे निर्माता असून गायक प्रशांत देसले यांनी हे गाणे गायले आहे. मच्छिन्द्र पवार हे गीतकार असून कलाकार म्हणून खान्देशातील ज्येष्ठ कलावंत, तोंडाई आक्का उर्फ पैसावाली ताई फेम विद्या भाटिया, मच्छिन्द्र  पवार, गणेश कुंभार व अंकिता बोदडे यांनी या गाण्यात भूमिका साकारल्या आहेत.

गाण्याचे दिग्दर्शन मच्छिन्द्र पवार, राहुल सोनवणे यांनी तर कोरियोग्राफर म्हणून राहुल सोनवणे यांनी काम पाहिले आहे. डीओपीसाठी साजिद मुजावर, वसीम मिर्झा, गाण्याचे एडिटिंग अजित मुव्हीज, निसार खान, ड्रॉन कॅमेरासाठी खाजा मणियार, मणियार स्टुडिओ यासह रघुनाथ कुंभार, दीपक कुंभार,फारुख खाटीक, भिकन कोळी, विकास कुंभार, क्रिष्णा कुंभार, सुरेश कुंभार, रतिलाल कुंभार आदींचे सहकार्य लाभले आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग आणि रिधम मयूर साळुंखे यांनी केले आहे. विशेष म्हणजे गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण उत्राण येथेच झाले आहे.

एका दिवसात २५ हजार व्ह्यूवर्सचा टप्पा पूर्ण

केवळ एकाच दिवसात हे गाणे रसिकांच्या पसंतीला उतरले असून रसिकांचा त्याला भरभरून प्रतिसाद प्रतिसाद लाभत आहे. एका दिवसात या गाण्याला तब्बल २५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. ‘गाडी पोम पोम’ अगोदर या टीमने साकारलेल्या इतर गाण्यांना देखील रसिकांनी उत्तम दाद दिली होती.

गाणे ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज