जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी ‘या’ तारखेला हाेणार मतदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावड कायम असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका लांबल्या. सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे आता वेगवेगळ्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी मतदान हाेईल.

मतदार याद्या तयार करून सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. २५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२१ सहकारी संस्था, गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवून १५ नोव्हेंबरपर्यंत समिती सचिवांकडे प्रारूप यादीसाठी सदस्य सूची पाठवावी. ती २९ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदारयादी तयार करून पाठवावी. १ डिसेंबरला मतदारयाद्या प्रसिद्ध होतील. १ ते १० डिसेंबर दरम्यान प्रारूप मतदार यादीवर आक्षेप हरकती, तर अंतिम मतदारयादी २४ डिसेंबरला जाहीर होईल.

यानंतर ३ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्यात नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती ३ ते ७ जानेवारी, नामनिर्देशन पत्र छाननी १० जानेवारी २०२२, वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी ११ जानेवारी, माघार ११ ते २५ जानेवारी, निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी २७ जानेवारी २०२२, मतदान ५ फेब्रुवारी २०२२ तर मतमोजणी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज